कोणत्या आजारामुळे वारंवार डोक दुखते जाणून घ्या

Business

09 February 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

काही लोकांना वारंवार डोक दुखते. हे शरीरातील एखाद्या समस्येचे लक्षण असू शकते. याकडे दुर्लक्ष केल्यास आणखी समस्या उद्भवू शकतात.

वारंवार डोक दुखणे

Picture Credit: Pinterest

एका बाजूला सतत तीव्र डोकेदुखी, प्रकाश किंवा आवाजामुळे अस्वस्थता ही मायग्रेनची लक्षणे असू शकतात. हे ताण, झोपेचा अभाव आणि हार्मोनल बदल यामुळे समस्या वाढू शकते.

मायग्रेनचा धोका

Picture Credit: Pinterest

वारंवार डोक दुखणे उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकते. विशेषतः सकाळी डोक जड होणे आणि चक्कर येणे या समस्या होऊ शकतात.

उच्च रक्तदाब

Picture Credit: Pinterest

दृष्टी कमकुवत झाल्यामुळेही डोकेदुखीची समस्या उद्भवते. मोबाईल फोन किंवा स्क्रीनकडे जास्त वेळ पाहिल्याने डोळ्यांवर दबाव वाढतो, ज्यामुळे डोकेदुखी होते.

डोळ्यांची कमजोरी

Picture Credit: Pinterest

सायनस संसर्ग किंवा रक्तसंचय यामुळे कपाळावर आणि डोळ्यांभोवती वेदना होणे. हवामान बदलताना किंवा थंडी पडल्यास ही वेदना अधिक त्रासदायक होते.

सायनसचा त्रास

Picture Credit: Pinterest

शरीरातील पाणी कमी झाल्यास डोकेदुखीची समस्या उद्भवते. दिवसभरात कमी पाणी प्यायल्याने ऑक्सिजन पुरवठ्यावर परिणाम होतो. ज्यामुळे डोत दुखणे आणि जड होते.

डिहाइड्रेशनची समस्या

Picture Credit: Pinterest

पुरेशी झोप घ्या, ताणतणाव टाळा, स्क्रीनवरचा वेळ मर्यादित करा आणि भरपूर पाणी प्या. जर तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

संरक्षण कसे करावे

Picture Credit: Pinterest