गांधीजींचा चरखा आता कुठे गेला? आज सूत कातण्यासाठी वापरतात हे मशीन!

Science Technology

01, Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

गांधीजी चरख्यावर कापसाच्या तंतूंना फिरवत त्यापासून सूत तयार करायचे. चरखा स्वावलंबन आणि खादीचं प्रतीक बनला.

चरख्यावर काय व्हायचं?

Picture Credit: Pinterest

आधुनिक पद्धतीतही सुरुवात कापसापासूनच होते. मात्र पुढची प्रक्रिया हाताने नव्हे, तर मोठ्या यंत्रांद्वारे केली जाते.

आजही कापसापासूनच सुरुवात

Picture Credit: Pinterest

कापसामध्ये असलेली धूळ, बिया आणि इतर अशुद्धता मशीनच्या मदतीने वेगळी केली जाते. यामुळे पुढील प्रक्रिया सोपी होते.

पहिलं काम: कापूस स्वच्छ करणे

Picture Credit: Pinterest

कापसाचे तंतू एकसारखे करण्यासाठी त्यांना कार्डिंग मशीनमधून नेलं जातं. इथे तंतू वेगळे होऊन एका दिशेने व्यवस्थित मांडले जातात.

तंतू सरळ करण्याची प्रक्रिया

Picture Credit: Pinterest

कार्डिंगनंतर कापसाचे तंतू मऊ, जाडसर पट्टीसारख्या स्वरूपात मिळतात. याला Sliver म्हणतात.

मग तयार होते ‘Sliver’

Picture Credit: Pinterest

अनेक Sliver एकत्र करून त्यांची जाडी समान केली जाते. त्यानंतर तंतूंना आणखी बारीक आणि मजबूत करण्यासाठी ड्रॉइंगची प्रक्रिया केली जाते.

आता येतो महत्त्वाचा टप्पा

Picture Credit: Pinterest

स्पिनिंग मशीन तंतूंना वेगाने फिरवत त्यांना आवश्यक ट्विस्ट देते. याच प्रक्रियेत सैल तंतू मजबूत सूत बनतात.

तंतूंना मिळते ट्विस्ट

Picture Credit: Pinterest

चरख्यावर एक व्यक्ती मर्यादित प्रमाणात सूत कातू शकते. आधुनिक स्पिनिंग मिलमध्ये मात्र हजारो स्पिंडल्स एकाच वेळी काम करू शकतात.

चरखा vs आधुनिक मशीन

Picture Credit: Pinterest

तयार सूत बॉबिन किंवा कोनवर गुंडाळलं जातं. त्यानंतर त्याचा वापर कापड विणण्यासाठी किंवा इतर Textile प्रक्रियांसाठी केला जातो.

सूत तयार… पुढे काय?

Picture Credit: Pinterest