घरामध्ये या ठिकाणी लावा दिवा 

Life style

25 August, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

हिंदू धर्मशास्त्रानुसार गणेश चतुर्थी दिवस महत्त्वाचा मानला जातो. दरवेळी हा सण भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षातील चतुर्थीला साजरा केला जातो.

गणेश चतुर्थी 2025

यंदा गणेश चतुर्थी चतुर्थी 27 ऑगस्ट रोजी आहे. जे भक्त पूजा करतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते 

पूजा करणे 

गणेश चतुर्थीला घरामध्ये या दिशेला दिवा लावल्याने तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. जाणून घ्या त्याबद्दल

दिवा लावा 

गच्छीवर दिवा लावणे

तुम्हाला कर्जाच्या समस्या असतील तर घराच्या छतावर दिवा लावायला पाहिजे. यामुळे तुमच्या समस्या दूर होण्यास मदत होईल.

ईशान्य दिशेला दिवा लावा

गणेश चतुर्थीच्या दिवशी दिवा लावताना दिशेकडे देखील लक्ष द्यायला हवे. घरामध्ये ईशान्य दिशेला दिवा लावावा. या दिशेला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो.

गणपती बाप्पाच्या समोर

गणेश चतुर्थीला गणपती बाप्पासमोर दिवा लावल्याने घरात हळूहळू संपत्ती येईल.

तुळशीजवळ दिवा लावणे

गणेश चतुर्थीला संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने तुमची प्रलंबित कामे लवकर पूर्ण होतील. अडकलेले पैसे परत मिळतील.

मुख्यप्रवेशदवाराजवळ दिवा

तुम्ही तुमच्या घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि सकारात्मक उर्जेसाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावावा.