लवकरच गणेश चतुर्थीची सुरुवात होणार आहे. यामुळे घरोघरी गणपती बाप्पाच्या स्वागताच्या तयारीला सुरुवात झाली आहे.
बरेच लोक घरात बाप्पाची स्थापना करतात त्याची मनोभावे पूजा केली जाते पण त्याआधी गणपती बाप्पासाठी घर सजवले जाते.
तुम्ही सुद्धा गणपतीची आरास कशी करायची याचा विचार करत असाल तर या टिप्स जाणून घ्या
ज्या ठिकाणी बाप्पाची स्थापना करणार आहात त्याच्या पाठीमागे एक कागद लावून घ्या. त्यानंतर त्यावरती खरी किंवा खोटी फुल लावा.
हल्ली बाजारात विविध प्रकारची तोरण उपलब्ध आहेत ती तुम्ही लावू शकता.
गणपती बाप्पाच्या पाठीमागे लहान मोठ्या घंटी लावून तुम्ही त्याची सजावट करू शकता.
पाठीमागे चांगला लुक देईचा असेल तर बाजारातून पतंग आणून ते चिकटवू शकता.
सजावट करण्यासाठी मातीच्या दिव्याचा तुम्ही वापर करू शकता. चारही दिशेला दिवे लावा किंवा लटकवून ठेवा
बाप्पाच्या समोर दोन दिव्याचे स्टॅण्ड लावा. बाजारामध्ये दिव्याचे स्टॅण्ड वेगवेगळ्या डिझाइनचे मिळतात.
तुम्ही ज्याप्रकारे सजावट कराल तशी शोभेल अशी बाप्पाच्या मूर्तीची निवड करा