बाप्पाच्या मखरासाठी खास इको फ्रेडली सजावट कशी करावी

Lifestyle

07 September 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

गणेश चतुर्थी 2026

यंदा गणेश चतुर्थी सोमवार, 14 सप्टेंबर रोजी आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी अशा प्रकारे सुंदर पर्यावरणपुरक मखर तयार करा.

Picture Credit: Pinterest

झेंडू, मोगरा आणि गुलाबाच्या फुलांनी बाप्पाचा मखर सजवा. फुलांचे तोरण, कमान किंवा पडदा तयार करून सजावटीला पारंपरिक आणि सुंदर लूक देता येईल.

फुलांची आकर्षक सजावट

Picture Credit: Pinterest

जुन्या वर्तमानपत्रांचा किंवा रंगीत कागदाचा वापर करून कमळ, फुलं, पानं आणि तोरण तयार करा. ही सजावट घरच्या घरी सहज करता येते आणि पुढच्या वर्षीही काही वस्तू पुन्हा वापरता येतात.

 कागदापासून बनवा सजावट

Picture Credit: Pinterest

साडी किंवा दुपट्ट्याचा बॅकड्रॉप

जुनी आकर्षक साडी किंवा दुपट्टा फेकून न देता त्याचा मखरासाठी बॅकड्रॉप म्हणून वापर करा. त्यावर फुलं, दिवे किंवा पारंपरिक तोरण लावल्यास सजावट अधिक उठून दिसेल.

Picture Credit: Pinterest

नैसर्गिक वस्तूंचा वापर

Picture Credit: Pinterest

केळीची पानं, नारळाची पानं किंवा इतर नैसर्गिक पानांनी बाप्पाचा मखर सजवता येतो. यामुळे सजावटीला साधा, पारंपरिक आणि निसर्गाशी जोडलेला लूक मिळतो.

रोपांनी सजवा बाप्पाचा कोपरा

Picture Credit: Pinterest

छोटी कुंडीतील रोपं बाप्पाच्या दोन्ही बाजूंना ठेवा. उत्सवानंतर ही रोपं बाल्कनी किंवा घराच्या बागेत ठेवता येतील, त्यामुळे सजावटीचा उपयोग पुढेही होतो.

 शाडू मातीची मूर्ती निवडा

Picture Credit: Pinterest

सजावटीसोबत बाप्पाची मूर्तीही पर्यावरणपूरक निवडण्याचा प्रयत्न करा. नैसर्गिक मातीपासून बनवलेल्या मूर्ती हा पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी एक पर्याय आहे.