माघी गणेश जयंती कधी आहे, जाणून घ्या

Life style

18 January, 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला साजरी केली जाते. तिला माघ विनायक चतुर्थी किंवा गौरी गणेश चतुर्थी असेही म्हणतात. 

गणेश जयंती 2026

माघ शुक्ल चतुर्थीची सुरुवात गुरुवार, 22 जानेवारी रोजी पहाटे 2.47 होईल आणि या तिथीची समाप्ती शुक्रवार, 23 जानेवारी रोजी पहाटे 2.28 होईल. उद्य तिथीनुसार, गणेश जयंती गुरुवार, 22 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे.

गणेश जयंती कधी आहे

शुभ मुहूर्त

यावर्षी गणेश जयंती पूजेसाठी शुभ मुहूर्त 2 तास 8 मिनिटे आहे. गणपतीची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी 11.29 ते दुपारी 1.37 पर्यंत असेल.

 रवि योग

गणेश जयंतीनिमित्त रवि योग सकाळी 7.14 वाजता सुरू होणार आहे आणि दुपारी 2.27 पर्यंत हा योग राहील. हा एक शुभ योग आहे जो सर्व नकारात्मक प्रभावांना दूर करतो. रवि योगादरम्यान गणेश जयंतीची पूजा केली जाईल.

भद्राचा कालावधी

पूजा मुहूर्तानंतर भद्रा लागू होते. गणेश जयंतीला भद्रा दुपारी 2.20 वाजता सुरू होईल आणि 23 जानेवारी रोजी पहाटे 2.38 पर्यंत चालेल

भद्रा कालावधीत पूजा

गणेश जयंतीला भद्रा असणार आहे. ज्यामुळे शुभ कार्यात अडथळा येईल, परंतु पूजा करण्यात कोणतेही अडथळे येणार नाहीत.

कोणता नैवेद्य दाखवायचा

माघी गणेश जयंतीला 'तिळाच्या लाडवांचे' विशेष महत्त्व असते. तिळ आणि गुळ हे उष्णतावर्धक असून शरीराला ऊर्जा देतात. म्हणूनच या दिवसाला 'तिलकुंद चतुर्थी' असेही म्हणतात.

आरोग्यासाठी फायदेशीर

जानेवारी महिन्यात येणारी ही चतुर्थी कडाक्याच्या थंडीत येते. विज्ञानाच्या दृष्टीने, तिळ आणि गुळ हे उष्णतावर्धक असून शरीराला ऊर्जा देतात. हा प्रसाद खाल्ल्याने आरोग्याचे रक्षण होते आणि मनाला शांती मिळते.

 जयंती आणि चतुर्थी फरक

भाद्रपद महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला 'गणेश चतुर्थी' म्हणतात तर माघ महिन्यात गणेश जयंती साजरी केली जाते. हा दिवस गणपतीचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो