कुरकुरीत मेथी पुरी आता घरीच बनवा

Life style

17 January 2026

Author:  नुपूर भगत

एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ घ्या. त्यात मीठ, लाल तिखट, हळद आणि जिरे घाला.

गव्हाचे पीठ

Picture Credit: Pinterest

आता बारीक चिरलेली ताजी मेथी घालून सगळे साहित्य नीट मिसळा.

मेथी घाला

Picture Credit: Pinterest

त्यात मोहनसाठी तेल किंवा तूप घाला आणि हाताने पीठ चोळून घ्या.

मोहन घाला

Picture Credit: Pinterest

थोडे थोडे पाणी घालत घट्ट कणीक मळून घ्या. कणीक 10 मिनिटे झाकून ठेवा.

कणिक मळा 

Picture Credit: Pinterest

कणकेचे छोटे गोळे करा आणि लाटण्याने मध्यम जाडीच्या छोट्या पुरी लाटा.

पुऱ्या लाटा 

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करा. तेल मध्यम गरम झाल्यावर पुरी सोडून दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळा.

तळून घ्या

Picture Credit: Pinterest

तळलेल्या मेथी पुरी कागदावर काढून अतिरिक्त तेल शोषून घ्या. पुऱ्यांना हवाबंद डब्यात साठवून ठेवा.

हवाबंद डब्यात साठवा

Picture Credit: Pinterest