पान-गुलकंदाचा भन्नाट संगम

Life style

12 September 2026

Author:  नुपूर भगत

पानाची पाने स्वच्छ धुऊन त्यांचे देठ काढा. पानांचे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये थोडे दूध घालून बारीक पेस्ट तयार करा.

पानाची पेस्ट तयार करा

Picture Credit: Pinterest

कढईत तूप गरम करून त्यात मावा घाला. मंद आचेवर मावा हलका गरम होईपर्यंत सतत ढवळत राहा. मावा जास्त भाजू नये याची काळजी घ्या.

मावा भाजून घ्या

Picture Credit: Pinterest

माव्यामध्ये तयार केलेली पानाची पेस्ट आणि हिरवा खाद्य रंग घाला. सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत मंद आचेवर परता.

पानाची चव मिसळा

Picture Credit: Pinterest

गॅस बंद करून मिश्रण थोडे थंड होऊ द्या. त्यात पिठीसाखर, वेलची पावडर, बडीशेप आणि नारळाचा बुरा घालून नीट मिसळा.

साखर आणि मसाले घाला

Picture Credit: Pinterest

एका वाटीत गुलकंद आणि थोडी बडीशेप एकत्र करा. हे मिश्रण मोदकाच्या आतील सारणासाठी वापरा.

गुलकंदाचे सारण

Picture Credit: Pinterest

मोदकाच्या साच्याला हलके तूप लावा. त्यात माव्याचे मिश्रण भरून साचा बंद करा आणि मोदक अलगद बाहेर काढा.

मोदकाचा आकार द्या

Picture Credit: Pinterest

तयार पान मोदकावर चांदीचा वर्ख किंवा बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स लावून सजवा. काही वेळ फ्रिजमध्ये ठेवून सेट करुन मोदक सर्व्ह करा.

 सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest