Launchपूर्वीच किंमत लीक

Science Technology

12 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

 Launchपूर्वीच किंमत लीक

Google Pixel 11 Series आज लॉन्च होण्याच्या काही तास आधी भारतातील संभाव्य किंमती समोर आल्या आहेत. या लाइनअपमध्ये Pixel 11, Pixel 11 Pro, Pixel 11 Pro XL आणि Pixel 11 Pro Foldचा समावेश आहे.

Picture Credit: pinterest

Pixel 11 कितीला?

लीकनुसार, Google Pixel 11ची सुरुवातीची किंमत ₹89,999 असू शकते. ही किंमत Pixel 10च्या लॉन्च किंमतीपेक्षा ₹10,000 जास्त आहे.

Pixel 11 Proची किंमत

Pixel 11 Proसाठी ₹1,19,999 किंमत लीक झाली आहे. म्हणजेच मागील जनरेशनच्या तुलनेत सुमारे ₹10,000ची वाढ होण्याची शक्यता आहे.

Pro XLसाठी ₹1.35 लाख?

मोठ्या स्क्रीनच्या Pixel 11 Pro XLची संभाव्य किंमत ₹1,34,999 असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे हा फोन थेट Premium Flagship Segmentमध्ये राहणार आहे.

लाईनअपमधील सर्वात महाग मॉडेल Pixel 11 Pro Fold ठरू शकतो. लीकनुसार त्याची किंमत तब्बल ₹1,86,999 असण्याची शक्यता आहे.

सर्वात महाग Pixel कोणता?

Pixel 10 Pro Fold भारतात ₹1,72,999ला लॉन्च झाला होता. त्याच्या तुलनेत Pixel 11 Pro Foldची लीक झालेली किंमत सुमारे ₹14,000 अधिक आहे.

मागील Foldपेक्षा किती महाग?

Pixel 11 Seriesमध्ये नवीन Tensor G6 चिप मिळण्याची अपेक्षा आहे. रिपोर्टनुसार, हा चिपसेट AI Processing, कार्यक्षमता आणि Thermal Performanceमध्ये सुधारणा आणू शकतो

Tensor G6ची ताकद

Pixel 11 Seriesमध्ये HiLight नावाचे नवीन LED-based feature येण्याची माहिती समोर आली आहे. वेगवेगळ्या रंगांच्या प्रकाशातून Notifications, Alerts आणि Updatesची माहिती देण्याची त्याची भूमिका असू शकते.

HiLight Featureची चर्चा

(फोटो सौजन्य – Pinterest)

Pixel 11 Seriesमध्ये Android 17चा अधिक Optimised अनुभव मिळण्याची अपेक्षा आहे. Googleचा On-device AI आणि Software Optimisationवर विशेष भर असू शकतो.

Android 17सोबत AIचा फोकस

(फोटो सौजन्य – Pinterest)

रिपोर्टनुसार Smartphone Industryमध्ये Memoryची वाढती मागणी आणि त्याच्याशी संबंधित खर्चामुळे Flagship Phonesच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. मात्र हा किंमतवाढीचा अधिकृत कारणनिर्देश नाही.

किंमत वाढण्यामागे कारण काय?

(फोटो सौजन्य – Pinterest)

सध्या समोर आलेले आकडे लीकवर आधारित आहेत. Googleकडून अधिकृत किंमत जाहीर झाल्यानंतरच अंतिम किंमत निश्चित होईल. त्यामुळे खरेदीदारांनी अधिकृत घोषणेची वाट पाहणे योग्य ठरेल.

अंतिम किंमत कधी कळणार?

(फोटो सौजन्य – Pinterest)

Pixel 11 Series Premium Segmentमध्ये आणखी महाग होण्याची शक्यता आहे. आता सर्वांच्या नजरा Googleच्या अधिकृत घोषणेकडे लागल्या आहेत.

₹89,999पासून ₹1,86,999पर्यंत!

(फोटो सौजन्य – Pinterest)