फोनच्या USB/Charging Port मध्ये ओलावा किंवा पाणी आढळल्यास Liquid Detected किंवा Moisture Detected असा अलर्ट दिसतो. हा फोनचे नुकसान टाळण्यासाठी दिला जाणारा सुरक्षा इशारा आहे.
Picture Credit: Pinterest
अलर्ट दिसताच चार्जर त्वरित काढा. जबरदस्तीने चार्जिंग केल्यास चार्जिंग पोर्ट किंवा फोनच्या सर्किटचे नुकसान होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
फोन कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी ठेवा. Charging Port खालीच्या दिशेने ठेवला तर ओलावा बाहेर पडण्यास मदत होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
– Hair Dryer वापरू नका – चार्जिंग पोर्टमध्ये कापूस किंवा पिन घालू नका – लगेच चार्जिंग सुरू करू नका
Picture Credit: Pinterest
फोन तांदळात ठेवण्यापेक्षा तो नैसर्गिकरित्या सुकू देणे अधिक सुरक्षित मानले जाते. तांदळाची धूळ चार्जिंग पोर्टमध्ये अडकण्याचा धोका असतो.
Picture Credit: Pinterest
काही तासांनंतरही Liquid Detected अलर्ट दिसत असेल, तर फोन पूर्णपणे कोरडा होईपर्यंत थांबा. समस्या कायम राहिल्यास अधिकृत Service Center मध्ये तपासणी करून घ्या.
Picture Credit: Pinterest
✔ चार्जर लगेच काढा ✔ फोन कोरडा होईपर्यंत चार्ज करू नका ✔ Hair Dryer किंवा Rice Trick टाळा ✔ गरज पडल्यास अधिकृत सर्व्हिस सेंटरची मदत घ्या
Picture Credit: Pinterest