गुरुपौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे.
Picture Credit: Pinterest
या पवित्र दिवशी आपण सर्वेच आपल्या गुरूंना भेटतो, त्यांच्याकडून मार्गदर्शन करत असतो.
चला जाणून घेऊयात, गुरूचं असणं आपल्या आयुष्यात का महत्वाचं आहे?
गुरू आपल्याला योग्य दिशा दाखवतात आणि जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी मार्गदर्शन करतात.
गुरूंच्या अनुभवातून आपल्याला पुस्तकी ज्ञानापलीकडचं खऱ्या आयुष्याचं शहाणपण मिळतं.
आपण जिथे चुकतोय, ते स्पष्टपणे सांगून स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी देतात.
योग्य वेळी दिलेल्या प्रेरणादायी शब्दांमुळे गुरू आपल्यात आत्मविश्वास निर्माण करतात.
आयुष्यात संकटं आली तरी गुरूंचं आश्वासक पाठबळ आपल्याला धैर्य देतं.