हलवाई स्टाईल रसमलाई घरी कशी तयार करायची?

Life style

20 October, 2025

Author:  नुपूर भगत

दूध उकळवून त्यात लिंबाचा रस घाला. दूध फाटल्यावर त्यातील पाणी वेगळं करून पनीर स्वच्छ कापडात गाळून ३० मिनिटे दाबून ठेवा.

 पनीर तयार करणे

Picture Credit: Pinterest

पनीर मऊ होईपर्यंत मळा आणि लहान गोळे तयार करा. हेच रसगुल्ले होणार आहेत.

गोळे बनवणे

Picture Credit: Pinterest

एका भांड्यात ३ कप पाणी आणि १ कप साखर घालून पाक उकळवा. त्यात तयार गोळे घालून १०-१२ मिनिटे शिजवा.

 साखरेचा पाक 

Picture Credit: Pinterest

दरम्यान दुसऱ्या भांड्यात ½ लिटर दूध उकळवा. त्यात थोडी साखर, केशर धागे, वेलदोडा पूड घालून घट्ट होईपर्यंत उकळा.

 रबडी तयार करणे

Picture Credit: Pinterest

शिजवलेले रसगुल्ले थंड पाण्यात ५ मिनिटे ठेवा आणि हलक्या हाताने दाबून त्यातील अतिरिक्त पाक काढा.

 रसगुल्ले थंड करणे

Picture Credit: Pinterest

आता हे गोळे तयार केलेल्या रबडीत टाका आणि किमान २-३ तास फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून ते छान भिजतील.

रसगुल्ले रबडीत भिजवणे

Picture Credit: Pinterest

थंडगार रस मलाई सर्व्ह करा आणि वरून बदाम-पिस्ते घालून सजवा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest