सोप्या पद्धतीमध्ये बनवा गोडसर बेसनाची बर्फी

Life style

18 October, 2025

Author:  नुपूर भगत

कढईत तूप गरम करून त्यात बेसन घाला. मंद आचेवर बेसन सोनेरी रंग येईपर्यंत आणि खमंग सुगंध येईपर्यंत ढवळत भाजा.

बेसन भाजणे

Picture Credit: Pinterest

बेसन चांगले भाजले की गॅस बंद करून थोडं थंड होऊ द्या.

बेसन थंड करणे

Picture Credit: Pinterest

दुसऱ्या भांड्यात साखर आणि पाणी घालून एक तंताचा पाक तयार करा (थोडं घट्ट पण जास्त नाही.

साखरेचा पाक

Picture Credit: Pinterest

भाजलेलं बेसन या साखरेच्या पाकात मिसळा आणि गॅसवर परत ठेवा. सतत ढवळत राहा म्हणजे गोळा होणार नाही.

बेसन आणि पाक एकत्र

Picture Credit: Pinterest

मिश्रण घट्ट व्हायला लागल्यावर त्यात वेलची पूड घाला आणि चांगलं मिसळा.

वेलची पूड घालणे

Picture Credit: Pinterest

तयार मिश्रण तुप लावलेल्या थाळीत ओतून समान पसरवा. वरून बदाम-पिस्त्याचे काप घाला आणि हलक्या हाताने दाबा.

थाळीत ओतणे

Picture Credit: Pinterest

मिश्रण थंड झाल्यावर हवे त्या आकाराचे तुकडे (बर्फीचे काप) करा.

 सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest