Published Dec 28, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
आज रतन टाटा यांचा वाढदिवस आहे.
रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला आणि 9 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांचे निधन झाले.
रतन नवल टाटा यांचे नाव भारतात आणि जगभरात मोठ्या आदराने घेतले जाते.
रतन टाटा यांना 2000 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
2008 मध्ये त्यांना पद्मविभूषण हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला.
रतन टाटा यांनी जगाला क्षणोक्षणी प्रेरित केलं आहे.
तुमची प्रतिष्ठा ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. तिचे संरक्षण करा.
यश तुमच्या डोक्यात जाऊ देऊ नका आणि अपयशाला तुमच्या हृदयात जाऊ देऊ नका.
भविष्याचा अंदाज लावण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे भविष्य घडवणं.
मी योग्य निर्णय घेण्यावर विश्वास ठेवत नाही, मी निर्णय घेतो आणि नंतर ते योग्य बनवतो.
मनुष्याचे जीवन हे चढ-उतारांनी भरलेले आहे.
आपलं मूळ कधी विसरु नका. जिथून तुम्ही आलात, त्याचा अभिमान बाळगा.
आयुष्यातील सर्वात मोठी जोखीम म्हणजे जोखीम न घेणे.
माणसाला स्वतःच्या विचारांशिवाय काहीही नष्ट करू शकत नाही.
संधी येण्याची वाट पाहू नका, स्वतःच्या संधी निर्माण करा.