Published Sept 10, 2024
By Shubhangi Mere
Pic Credit - Social Media
टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आज 34 वर्षांचा झाला. सूर्याला चाहते आणि दिग्गज खेळाडूंकडून शुभेच्छा देत आहेत, यानिमित्ताने त्याच्या काही क्षणांवर नजर टाका.
सूर्याने T20 क्रिकेटमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून या फॉरमॅटमध्ये त्याने भारतीय संघाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत.
सूर्यकुमारची फलंदाजी पाहून दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सची आठवण येते. सूर्याला भारताचे 'मिस्टर 360' म्हणणे अयोग्य ठरणार नाही.
सूर्यकुमार यादवने T२० फॉरमॅटमध्ये 42.66 च्या सरासरीने 2432 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 4 शतके आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे.
सूर्यकुमार यादव दीर्घकाळापासून ICC T20 क्रमवारीत नंबर 1 फलंदाज आहे. सध्या तो क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
सूर्या हा प्लेअर ऑफ द मॅचचे पुरस्कार नावावर करण्याच्या यादीमध्ये अव्वल स्थानावर आहे, त्याने आतापर्यत १६ पुरस्कार नावावर केले आहेत.
T20 आंतरराष्ट्रीय सर्वाधिक शतके मारण्याचा यादीमध्ये सूर्यकुमार हा तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने आतापर्यत ४ शतक ठोकले आहेत. रोहित या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
T२० विश्वचषक २०२४ मध्ये फायनलच्या सामन्यात डेव्हिड मिलरचा कॅच पकडून वर्ल्ड कप भारताच्या नावावर केला.
T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला आता भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषवण्यात आले आहे.