Published Sept 9, 2024
By Shubhangi Mere
Pic Credit - Social Media
भारताने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये २९ मेडलची कमाई केली आहे, यामध्ये अनेक पॅरा खेळाडूंनी मल्टिपल मेडल मिळवून इतिहास रचला आहे.
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचा कपिल परमार याने ब्लाइंड पॅरा जुडोमध्ये कांस्यपदक मिळवून इतिहास घडवला आहे, हे भारताचे पहिले जुडोमधील मेडल आहे.
ट्रक ॲथलेटिक्समध्ये मेडल मिळावरी पहिली भारतीय, प्रीती पाल हिने १०० मी आणि २०० मीटर स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळवून इतिहास घडवला.
.
भारताचा पॅरा आर्चर हरविंदर सिंह याने पहिल्यांदा पॅरालिम्पिकमध्ये फायनल गाठून आर्चरीमध्ये गोल्ड मेडल मिळवलं आहे.
सुहास यथिराज याने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौम्य पदक मिळवलं होत, तर पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सुद्धा त्याने रौम्य पदकावर कब्जा केला आणि इतिहास घडवला.
मरियप्पन थांगावेलू याने सलग तीन ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणारा पहिला भारतीय ठरला, त्याने २ सुवर्ण आणि १ कांस्यपदक मिळवलं आहे.
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताची पॅरा शटलर मनीषा रामदास हिने ब्रॉन्झ मेडल सामन्यामध्ये दमदार कामगिरी करत कांस्यपदक मिळवलं.
भारताने पहिल्यांदा क्लब थ्रो मध्ये मेडल्स मिळवून इतिहास घडवला, यामध्ये धरमबीर याने सुवर्ण आणि सुरज सुरमा याने रौम्य पदकावर नाव कोरलं.
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये एकाहून अधिक सुवर्ण पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली, अवनी लेखाराने २ सुवर्ण आणि १ कांस्यपदक नावावर केलं आहे.