Published Oct 18, 2024
By Chetan Bodke
Pic Credit - Instagram
श्रीकृष्ण ते चॉकलेट बॉय, जाणून घ्या स्वप्नील जोशीबद्दल...
‘श्रीकृष्ण’ मालिकेत ‘कृष्णा’ची व्यक्तिरेखा साकारत प्रसिद्धीझोतात आलेल्या स्वप्नील जोशीचा आज वाढदिवस आहे.
स्वप्नील जोशीचा जन्म १८ ऑक्टोबर १९७७ रोजी झाला असून त्याने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
१९८६मध्ये रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत स्वप्नीलने ‘कुश’ची भूमिका साकारली होती. पण त्याला प्रसिद्धी 'कृष्णा' शोमधूनच मिळाली.
.
'कृष्णा' शोने स्वप्नीलला टीव्ही इंडस्ट्रीत रातोरात लोकप्रिय केले. दमदार अभिनयाच्या जोरावर स्वप्नीलने टीव्हीवरून मोठ्या पडद्यावरही प्रवेश केला.
.
स्वप्नीलसाठी २०२४ हे वर्ष हाऊसफुल्ल असणार तर आहे आणि तितकच खास देखील आहे.
स्वप्नील प्रसिद्ध अभिनेता असून निर्माताही आहे.
स्वप्नील येणाऱ्या काळात जिलबी, सुशीला- सुजित अशा अनेक चित्रपटांचा तो भाग होणार आहे.
अभिनय आणि निर्मिती दोन्हीही कामं सांभाळत येणाऱ्या काळात स्वप्नील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे.