पनीर खायला बऱ्याच जणांना आवडते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. आपल्याला शरीराला त्याचे फायदे होतात. मात्र जास्त प्रमाणात खाल्ल्यास कोणते तोटे होतात, जाणून घ्या
पनीरमध्ये चरबी आणि कॅलरीज जास्त असतात, त्यामुळे जास्त प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढू शकते.
पनीरमध्ये चरबी आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकते.
पनीरमध्ये फायबरचे प्रमाण कमी असते आणि प्रथिने जास्त असल्याने पचनाच्या समस्या उद्भवतात.
पनीरमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते. शरीरामध्ये कॅल्शिअमच्या प्रमाणामुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो.
पनीरमध्ये सोडिअमचे प्रमाण जास्त असल्यास उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांच्या आरोग्यासाठी ते हानिकारक आहे
कच्चे पनीर जास्त प्रमाणात खाल्ल्याने संसर्गाचा धोका वाढू शकतो. विशेषतः पनीर चांगल्या ठिकाणाहून खरेदी केले नसल्यास होतो.