हरतालिका तिथी सर्वांत महत्त्वाची आणि मोठी तिथी मानली जाते. यावेळी 26 ऑगस्ट रोजी हरतालिकेचे व्रत पाळले जाणार आहे. हे व्रत विवाहित महिला आणि अविवाहित मुली उपवास करतात.
असे मानले जाते की देवी पार्वतीच्या वडिलांनी तिचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला तेव्हा ती तिच्या मैत्रिणींसह कठोर तपश्चर्या करण्यासाठी वनात गेली.
भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला देवीने वाळूपासून शिवलिंग बनवले आणि त्याची विधिवत पूजा केली जाते. या पूजेमुळे महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला पत्नी म्हणून स्वीकारले.
अशा प्रकारे जी महिला हरतालिकेच्या दिवशी वाळून शिव पार्वतीची मूर्ती बनवते त्याची विधिवत पूजा करते. अशांना सौभाग्याची प्राप्ती होते.
हरतालिकेच्या दिवशी कोणत्या गोष्टी केल्याने फायदा होतो, जाणून घ्या
हरतालिकेच्या दिवशी महादेव आणि पार्वतीची पूजा करुन त्यांना खिरीचा नैवेद्य दाखवा.
विवाहित महिलांनी निर्जल व्रत करावे आणि संध्याकाळी महादेवांची पूजा करावी. तसेच ओम गौरी शंकर ओम नमः या मंत्रांचा जप करावा.
देवीला अर्पण केलेल्या चुनरीमध्ये आपल्या श्रद्धेनुसार 11, 21, 101 रुपये अर्पण करावे.
पूजा झाल्यानंतर जे पैसे आपल्या चुनरीमध्ये बांधले आहे ते आपल्याजवळ ठेवावे. यामुळे जीवन सुखी होते.