हरतालिकाचे व्रत सुहासिनींसाठी खूप खास मानले जाते. यावेळी हे व्रत मंगळवार, 26 ऑगस्ट रोजी आहे.
मान्यतेनुसार देवी पार्वतीने कठोर तपश्चर्या करुन भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त केले होते. या दिवशी व्रतासोबत दानालाही महत्त्व आहे.
या दिवशी सुहासिनींनी सिंदूर, टिकली, बांगड्या, पैंजण, कंगवा आणि काजळ या गोष्टींचे दान करावे.
सुपारी आणि सुपारीच्या पानांना शुभ मानले जाते. व्रताच्या दिवशी याचे दान करणे शुभ मानले जाते.
या दिवशी गरजूंना कपडे आणि हंगामी फळे दान केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती येते.
हरतालिकेच्या दिवशी गहू, तांदूळ, डाळ आणि मिठाई यांसारख्या गोष्टींचे दान करावे. यामुळे घरात अन्नधान्याची कमतरता भासत नाही.
हरतालिकेच्या दिवशी पूजेचे साहित्य म्हणजे धूप, कापूर, दिवा, नारळ, कलश इत्यादी गोष्टीचे दान करणे शुभ मानले जाते.
या दिवशी गाईला चारा देणे किंवा गाय दान करणे शुभ मानले जाते. तसेच गरजूंना कपड्यांचे दान करावे.