बाळाला Nebulizer का दिलं जातं? प्रत्येक पालकाने जाणून घ्याव्यात 'या' गोष्टी

Science Technology

11 July 2026

Author: प्रज्ञा घोगळे - निकम

हे उपकरण द्रवरूप औषधाचे अतिशय बारीक धुक्यात रूपांतर करते. हे धुके बाळ श्वासावाटे फुफ्फुसांपर्यंत पोहोचते.

Nebulizer म्हणजे नेमकं काय?

Picture Credit: Pinterest

साधी सर्दी किंवा नाक वाहत असल्यामुळेच Nebulizer दिला जात नाही. बाळाची लक्षणे पाहून डॉक्टर निर्णय घेतात.

प्रत्येक सर्दीत Nebulizer लागत नाही

Picture Credit: Pinterest

बाळाला घरघर (Wheezing), श्वास घेण्यास त्रास किंवा श्वसनमार्गात सूज असल्याचा संशय असल्यास Nebulizer उपयोगी ठरू शकतो.

डॉक्टर कधी सुचवतात?

Picture Credit: Pinterest

औषध थेट श्वसनमार्गात पोहोचल्याने काही परिस्थितींमध्ये श्वास घेणे सोपे होण्यास आणि श्वसनमार्गातील सूज कमी होण्यास मदत होऊ शकते.

Nebulizer कसा मदत करतो?

Picture Credit: Pinterest

Nebulizer मध्ये कोणते औषध आणि किती प्रमाणात वापरायचे, हे फक्त डॉक्टरच ठरवतात.

औषध स्वतःहून वापरू नका

Picture Credit: Pinterest

प्रत्येक वापरानंतर मास्क, कप आणि इतर भाग स्वच्छ करून वाळवणे महत्त्वाचे आहे.

उपचारानंतर मशीन स्वच्छ करा

Picture Credit: Pinterest

बाळाला श्वास घेण्यास खूप त्रास होत असेल, ओठ निळे पडत असतील, खूप सुस्ती येत असेल किंवा दूध पिणे बंद झाले असेल, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

ही लक्षणे दिसल्यास विलंब करू नका

Picture Credit: Pinterest