खजूर हे नियमित भिजवून खाणे नक्कीच फायदेशीर ठरते. पण खजूराचे पाणी पिण्याने नक्की काय होते जाणून घेऊ
Picture Credit: iStock
न्यूट्रिशनिस्ट गरिमा गोयलने खजुराच्या पाण्याचा शरीराच्या कोणत्या अवयवासाठी उपयोग होतो सांगितले आहे
खजुराच्या पाण्यामुळे गॅस, ब्लोटिंग आणि पोटाला आलेली सूज कमी होते. पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता निघून जाते
खजुराचे पाणी कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात आणण्यास मदत करते. यातील मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हृदय चांगले राखते
खजुराच्या या पाण्यामुळे रक्त शुद्ध होते ज्यामुळे त्वचा चमकदार होते आणि डाग कमी होऊन चेहरा नैसर्गिक ग्लो करतो
टॉक्झिन्स आणि फ्री रॅडिकल्स शरीरातून बाहेर काढून टाकण्यासाठी खजुराच्या पाण्याचे सेवन करावे. शरीरातील घाण काढून ताजेपणा भरते
रात्री 4-5 खजूर एक कप पाण्यात भिजवावे सकाळी उठून ते पाणी पहिले प्यावे मग खजूर खावेत. यामुळे पोषक तत्व मिळतात
खजुरात फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि प्रोटीन असतात. पाण्यात ही पोषक तत्व मिसळल्याने अधिक फायदा होतो
6-7 तासापेक्षा अधिक काळ खजूर भिजवू नयेत अन्यथा फर्मेंटेशन सुरु होते. सकाळी याचे सेवन करून फरक पहा
डॉक्टरांचा सल्ला घ्या आम्ही कोणताही दावा करत नाही