Published Dev 27, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
आरोग्य डाएट अँड न्यूट्रिशन क्लिनिकच्या डाएटिशियन डॉ. सुगीता मुटरेजा यांनी ओव्याच्या पाण्याचे फायदे सांगितले आहेत
ओव्यात कॅल्शियम, लोह, फॅटी अॅसिड, प्रोटीन, मॅग्नेशियम आणि फॉस्फोरससारखे तत्व आढळतात
ओव्यात अँटीऑक्सिडंट्स, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळतात जे खूपच फायदेशीर ठरतात
1 लहान चमचा ओवा 1 ग्लास पाण्यात रात्रभर भिजवा आणि सकाळी गाळून हे पाणी प्या, हे तुम्ही उकळूनही पिऊ शकता
ओव्यात एंजाईम असून सकाळी ओव्याचे पाणी पिण्याने गॅस, अपचन, ब्लोटिंगसारख्या समस्या दूर होतात आणि पचनक्रिया चांगली होते
ओव्यातील अँटीइन्फ्लेमेटरी गुण शरीरातील सूज आणि त्रास कमी करण्यास मदत करतात
.
सकाळी ओव्याचे पाणी पिण्याने कोणत्याही इन्फेक्शनपासून तुमचा बचाव होतो आणि पोटदुखीही होत नाही
.
ओव्याचे पाणी नियमित सेवन केल्याने वजन कमी होते आणि अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत मिळते
.
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही
.