आजच्या जीवनशैलीत हर्बल टीचा ट्रेंड झपाट्याने वाढतो आहे. त्यातही 'मोरिंगा टी' म्हणजेच शेवग्याच्या पानांचा चहा हा सध्या सर्वाधिक लोकप्रिय पेय ठरत आहे. आयुर्वेदानुसार शेवग्याच्या पानांना 'त्रिदोषनाशक' मानले गेले आहे. म्हणजेच ते शरीरातील वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोघांना संतुलित ठेवण्यास मदत करते
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
मोरिंगामध्ये विटॅमिन ए, सी, ई, कॅल्शियम, आयर्न, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. दररोज एक कप मोरिंगा टी प्यायल्याने शरीराला अनेक प्रकारचे आरोग्य फायदे मिळतात.
Picture Credit: Pinterest
आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते, मोरिंगा टी शरीरातील टॉक्सिन्स (विषारी द्रव्ये) बाहेर टाकण्यास मदत करते. त्यामुळे लिव्हर आणि किडनीचे कार्य सुधारते, आणि शरीर हलके व ऊर्जावान वाटते.
Picture Credit: Pinterest
मोरिंगा टी भूक कमी करते आणि मेटाबॉलिज्ञाम वाढवते, ज्यामुळे शरीरातील चरबी लवकर जळते, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना गती मिळते.
Picture Credit: Pinterest
या चहामधील विटॅमिन ए आणि बीमुळे केसांच्या मुलांना मजबुती मिळते. नियमित सेवनाने केस गळणे कमी होते आणि केस अधिक घनदाट व निरोगी दिसतात.
Picture Credit: Pinterest
मोरिंगा टीतील पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
Picture Credit: Pinterest
या चहामधील फायबरमुळे पचन तंत्र मजबूत होते. त्यामुळे कब्ज, गॅस, अपचन अशा समस्या दूर होतात.