गाजरामध्ये विटॅमिन 'सी' आणि बीटा-कॅरोटीन भरपूर असते, ज्यामुळे हिवाळ्यातील सर्दी, खोकला आणि संसर्गापासून संरक्षण होते.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
गाजरातील बीटा-कॅरोटीनचे शरीरात विटॅमिन 'ए' मध्ये रूपांतर होते, जे दृष्टी तेज ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Picture Credit: Pinterest
यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि पोट साफ राहते.
Picture Credit: Pinterest
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. गाजरातील अँटिऑक्सिडंट्स आणि पाण्याचे प्रमाण त्वचेला आतून हायड्रेट आणि तजेलदार ठेवतात.
Picture Credit: Pinterest
गाजरात कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे अनावश्यक खाणे टळते.
Picture Credit: Pinterest
यातील पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
Picture Credit: Pinterest
दुपारच्या जेवणासोबत किसलेले गाजर किंवा काप खाणे सर्वात फायदेशीर ठरते.
Picture Credit: Pinterest
थंडीच्या दिवसांत संध्याकाळी गरमागरम गाजर-टोमॅटो किंवा आल्याचे सूप प्यायल्याने शरीराला ऊब मिळते.