सीताफळ खाण्याचे फायदे जाणून घ्या

Lifestyle

09 july 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

सीताफळ खाण्याचे फायदे 

हे हंगामी फळ तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवते, पचनक्रिया सुधारते आणि पावसाळ्यात होणाऱ्या संसर्गापासून (सर्दी-खोकला) संरक्षण करते. पावसाळ्यात सीताफळ खाण्याचे प्रमुख फायदे जाणून घ्या

Picture Credit: Pinterest

सीताफळामध्ये मुबलक प्रमाणात विटॅमिन सी असते, जे पांढऱ्या पेशींचे कार्य सुधारून पावसाळ्यातील सर्दी, खोकला आणि तापापासून बचाव करते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

Picture Credit: Pinterest

पचनक्रिया सुधारते

यामध्ये फायबर चांगल्या प्रमाणात असते. पावसाळ्यात अनेकदा पचन मंदावते, अशा वेळी सीताफळ खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते आणि पचनक्रिया सुरळीत चालते.

Picture Credit: Pinterest

सीताफळात विटॅमिन बी-६ असते, जे श्वसनमार्गातील सूज कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे दम्याची लक्षणे आटोक्यात राहतात.

दम्याचा त्रास कमी होतो 

Picture Credit: Pinterest

पावसाळ्यात अनेकदा थकवा जाणवतो. सीताफळामध्ये नैसर्गिक साखर आणि भरपूर कॅलरीज असतात, ज्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि अशक्तपणा दूर होतो.

ऊर्जा आणि ताकद मिळते 

Picture Credit: Pinterest

हृदयासाठी चांगले 

Picture Credit: Pinterest

हे फळ कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.

रक्ताची कमतरता दूर होते 

Picture Credit: Pinterest

यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे ॲनिमिया (रक्तक्षय) असलेल्या रुग्णांसाठी याचे सेवन फायदेशीर ठरू शकते