पावसाळ्यात भाजलेल्या मक्यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे (उदा. विटॅमिन सी आणि बी) आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, पचनक्रिया सुधारतात आणि शरीराला ऊर्जा देतात. पावसाळ्यात मका खाण्याचे प्रमुख फायदे जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
मक्यामध्ये भरपूर फायबर असते. हे पचनसंस्थेचे आरोग्य सुधारून पावसाळ्यात होणाऱ्या पोटाच्या समस्या टाळण्यास मदत करते.
Picture Credit: Pinterest
यात नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स असतात, जे शरीराला दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देतात. पावसाळ्यात जाणवणारा थकवा दूर करण्यासाठी हा एक उत्तम स्नॅक आहे.
Picture Credit: Pinterest
मक्यामध्ये विटॅमिन सी आणि झिंकसारखे महत्त्वाचे खनिजे असतात, जे हवामान बदलामुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात.
Picture Credit: Pinterest
मक्यात ‘ल्युटीन’आणि ‘झियाक्सॅन्थिन’नावाचे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवतात.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
उकडलेला मका हा कमी फॅट असणारा आणि पोट जास्त वेळ भरलेला ठेवणारा पदार्थ आहे, ज्यामुळे अतिरिक्त भूक लागत नाही.
Picture Credit: Pinterest
मका शक्यतो ताजा, स्वच्छ ठिकाणी भाजलेला किंवा उकडलेला असावा. त्यावर बटर किंवा जास्त मीठ लावण्याऐवजी लिंबाचा रस आणि काळे मीठ वापरणे अधिक आरोग्यदायी ठरते.