फणसाच्या बिया खाण्याचे फायदे जाणून घ्या

Lifestyle

17 june 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

फणसाच्या बिया खाण्याचे फायदे

फणसाच्या बिया आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानल्या जातात. यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन, फायबर, विटॅमिन बी-कॉम्प्लेक्स आणि पोटॅशियम असते.  

Picture Credit: Pinterest

फणसाच्या बियांमध्ये आहारातील फायबर आणि रेझिस्टंट स्टार्चचे प्रमाण जास्त असते. हे बद्धकोष्ठता दूर करते आणि पोटाचे आरोग्य चांगले ठेवते.

पचनक्रिया सुधारते

Picture Credit: Pinterest

फायबरमुळे पोट बराच वेळ भरलेले राहते, ज्यामुळे भूक कमी लागते. तसेच हे चयापचय वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे वजन कमी होण्यास फायदा होतो.

वजन नियंत्रित राहते 

Picture Credit: Pinterest

हृदयासाठी फायदेशीर

फणसाच्या बियांमध्ये मुबलक पोटॅशियम असते, जे हृदयाचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवते.

Picture Credit: Pinterest

यात भरपूर लोह असते, जे शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यास आणि ऊर्जा देण्यास मदत करते.

अशक्तपणा दूर होतो 

Picture Credit: Pinterest

जर आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करायच्या असतील तर यासाठी फणसाच्या बिया फायदेशीर आहेत. सर्वात अगोदर या बिया दूधात भिजवून ठेवा आणि नंतर याची बारीक पेस्ट तयार करा. दररोज ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. 25 मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर तशीच ठेवा आणि पाण्याने धूवा. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील.

चेहऱ्यासाठी फायदेशीर

Picture Credit: Pinterest

डोळ्यांसाठी फायदेशीर

Picture Credit: Pinterest

विटॅमिन ए डोळ्यांसाठी आवश्यक पोषक आहे. विटॅमिन ए असल्याने आपले केसही चांगले राहतात. फणसामध्ये विटॅमिन-ए, विटॅमिन-बी 6 आणि विटॅमिन-सी असतात. विटॅमिन-ए आपल्या डोळ्यांसाठी, विटॅमिन बी 6 मेंदूसाठी आणि विटॅमिन-सी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असते.

कसे करावे सेवन

Picture Credit: Pinterest

फणसाच्या बियांचे सेवन तुम्ही उकडून, भाजून किंवा त्याची भाजी बनवून करू