भेंडी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते, कोलेस्ट्रॉल कमी करून हृदय निरोगी ठेवते, पचनक्रिया सुधारून बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करते, वजन आटोक्यात ठेवण्यास मदत करते आणि गरोदरपणात गर्भाच्या विकासासाठी फायदेशीर ठरते.
Picture Credit: Pinterest
भेंडी मधुमेहासाठी उत्तम मानली जाते. तिच्यातील पोषक घटक साखरेचे शोषण कमी करतात आणि इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारतात.
Picture Credit: Pinterest
भेंडीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर आणि चिकट घटक (म्युसिलेज) असतात. यामुळे पचनक्रिया सुरळीत चालते आणि बद्धकोष्ठता व गॅसची समस्या दूर होते.
Picture Credit: Pinterest
भेंडीतील विरघळणारे फायबर शरीरातील 'बॅड कोलेस्ट्रॉल' कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका टळतो.
Picture Credit: Pinterest
भेंडीमध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि फायबर जास्त असते. यामुळे बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते आणि अतिरिक्त भूक लागत नाही.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
भेंडीमध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक असतात. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेला नैसर्गिक तेज प्राप्त होते.
Picture Credit: Pinterest
गरोदरपणात फायदेशीर भेंडीमध्ये 'फोलेट' (विटॅमिन बी-९) चे प्रमाण चांगले असते, जे गरोदरपणात बाळाच्या मेंदूच्या आणि मज्जासंस्थेच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक असते