रोजच्या आहारात शेवग्याच्या पानांचा समावेश केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो, तसेच पचनक्रिया सुधारून हाडे मजबूत होतात.
Picture Credit: Pinterest
यामध्ये विटॅमिन ए, सी, ई आणि बी-कॉम्प्लेक्स यांसारखी आवश्यक जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम, पोटॅशियम, लोह व प्रथिने असतात.
Picture Credit: Pinterest
रिकाम्या पोटी शेवग्याची पाने चावून खाल्ल्यास किंवा त्याचा रस घेतल्यास रक्तातील साखर आणि रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
या पानांमध्ये मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे शरीर विविध संसर्ग आणि आजारांचा चांगला मुकाबला करू शकते.
Picture Credit: Pinterest
शेवग्याच्या पानांमध्ये फायबरचे प्रमाण उत्तम असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि पोटाचे आरोग्य चांगले राहते.
Picture Credit: Pinterest
या पानांमधून शरीराला भरपूर कॅल्शियम मिळते. त्यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो आणि हाडे मजबूत बनतात.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
पानांमधील पोषकतत्त्वांच्या गुणधर्मांमुळे केस गळणे कमी होते आणि त्वचा निरोगी राहते.
Picture Credit: Pinterest
रोज सकाळी रिकाम्या पोटी ५-६ कोवळी पाने चावून खाल्ल्यास उत्तम फायदा होतो किंवा डाळीमध्ये टाकून, झुणका, थालीपीठ किंवा भाजी बनवून ही पाने खाता येतात.