पनीरमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असल्यामुळे हाडे मजबूत राहण्यासाठी आणि स्नायूंच्या विकासासाठी मदत होते. पनीरचे नियमित व योग्य प्रमाणात सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात
Picture Credit: Pinterest
पनीरमध्ये उच्च दर्जाचे प्रोटीन असते. तसेच कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे सांधेदुखी कमी होते, हाडे बळकट होतात आणि दातही मजबूत राहतात.
Picture Credit: Pinterest
पनीर खाल्ल्याने पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते आणि लवकर भूक लागत नाही, ज्यामुळे वजन आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
पनीरमध्ये मॅग्नेशियम असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते, त्यामुळे ते मधुमेहाच्या रुग्णांसाठीही चांगला पर्याय आहे.
Picture Credit: Pinterest
यात असणारे फॉस्फरस पचनक्रिया सुधारण्यास आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
Picture Credit: Pinterest
शाकाहारी आहारातून प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी पनीर हा सर्वात उत्तम व चवदार पर्याय आहे.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
पनीर पचायला थोडे जड असते, त्यामुळे ज्यांची पचनशक्ती उत्तम आहे तेच त्याचे सहज पचन करू शकतात. नेहमी ताजे आणि घरगुती बनवलेले पनीर खाणे अधिक सुरक्षित असते.