नाचणीच्या भाकरीचा आहारात समावेश का करावा?

Lifestyle

23 july 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

नाचणीची भाकरी खाण्याचे फायदे

हाडे मजबूत होतात, वजन कमी होण्यास मदत होते, पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. हे ग्लूटेन-मुक्त धान्य असल्याने आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. नाचणीची भाकरी खाण्याचे फायदे जाणून घ्या

Picture Credit: Pinterest

नाचणी हे कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोत मानले जाते. एका अभ्यानुसार, १०० ग्रॅम नाचणीमध्ये सुमारे ३२० ते ३४४ मिलीग्राम कॅल्शियम असते. त्यामुळे नाचणीची भाकरी नियमित खाल्ल्याने हाडे आणि दात मजबूत होतात.

 हाडे मजबूत होतात

Picture Credit: Pinterest

 वजन नियंत्रणात राहते 

नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात डायटरी फायबर आणि प्रथिने असतात. नाचणीची भाकरी खाल्ल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही. यामुळे अतिरिक्त खाणे टाळले जाते आणि वजन कमी करण्याच्या प्रवासात मदत होते.

Picture Credit: Pinterest

नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे नाचणीची भाकरी खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी एकदम वाढत नाही, तर ती हळूहळू नियंत्रित राहते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा एक उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय आहे. 

मधुमेह नियंत्रित करते 

Picture Credit: Pinterest

नाचणी पचायला हलकी असते आणि त्यात मुबलक फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर होतात. यामुळे पचनतंत्र निरोगी राहण्यास मदत होते. 

पचनक्रिया सुधारते 

Picture Credit: Pinterest

लोहाची कमतरता दूर करते 

Picture Credit: Pinterest

नाचणीमध्ये लोहचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते. ॲनिमिया (रक्ताची कमतरता) असणाऱ्या लोकांसाठी नाचणीची भाकरी खाणे खूप गुणकारी ठरते.

हृदय निरोगी ठेवते 

Picture Credit: Pinterest

नाचणीच्या सेवनामुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सनी युक्त ही भाकरी हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.

त्वचा आणि केसांसाठी उत्तम 

Picture Credit: Pinterest

नाचणीमध्ये मेथिओनिन आणि लायसिनसारखे अमिनो ॲसिड असतात. हे घटक त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यास आणि अकाली केस पांढरे होण्यापासून रोखण्यास मदत करतात.