बेकरीसारखा स्वादिष्ट पनीर पफ आता घरातच

Life style

07 July 2026

Author:  नुपूर भगत

कढईत तेल गरम करून त्यात कांदा घालून हलका सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर आले-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून एक मिनिट परता.

कांदा-शिमला मिरची परता 

Picture Credit: Pinterest

आता ढोबळी मिरची घालून २–३ मिनिटे शिजवा. त्यात हळद, लाल तिखट, धणे-जिरे पूड, गरम मसाला आणि मीठ घालून नीट मिसळा.

मसाले घाला

Picture Credit: Pinterest

 पनीरचे तुकडे आणि कोथिंबीर घालून सर्व मिश्रण २ मिनिटे परता. गॅस बंद करून स्टफिंग पूर्णपणे थंड होऊ द्या.

पनीर घाला

Picture Credit: Pinterest

पफ पेस्ट्री शीट थोडी मऊ झाल्यावर चौकोनी तुकडे करा. प्रत्येक तुकड्याच्या मध्यभागी पनीरचे स्टफिंग ठेवा.

स्टाफिंग भरा

Picture Credit: Pinterest

पेस्ट्री दुमडून कडा काट्याच्या साहाय्याने हलक्या दाबून बंद करा, जेणेकरून बेक करताना स्टफिंग बाहेर येणार नाही.

कडा बंद करा

Picture Credit: Pinterest

तयार पफवर ब्रशने दूध लावा. ओव्हन २००°से. वर प्रीहीट करून पफ २०–२५ मिनिटे किंवा सोनेरी आणि खुसखुशीत होईपर्यंत बेक करा.

बेक करा

Picture Credit: Pinterest

गरमागरम पनीर पफ ओव्हनमधून बाहेर काढा आणि टोमॅटो केचप, हिरवी चटणी किंवा चहासोबत सर्व्ह करा.  

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest