Published Dev 04, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
भाजलेल्या आल्याचे सेवन केल्याने इम्युनिटी वाढते तसेच यामुळे हंगामी आजारापासून बचाव करता येतो
फिट क्लिनिकमधील डाएटिशियन सुमन यांनी भाजलेल्या आल्याचे अधिक फायदे वाचकांना सांगितले आहेत
आल्यातील फायबर पचनसाठी चांगले असून जेवल्यानंतर खाल्ल्याने पोटदुखी, बद्धकोष्ठता, गॅससारखे आजार दूर होतात
तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर भाजलेले आले आपल्या डाएटमध्ये समाविष्ट करून घ्या. यातील फायबर भूक नियंत्रित करते
भाजलेल्या आल्यात एनाल्सेजिक आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुण असतात जे सांधेदुखी, सूज आणि गुडघ्याचे त्रास कमी करते
डायबिटीसच्या रूग्णांसाठी भाजलेले आले फायदेशीर असून ब्लड शुगर आणि इन्सुलिन नियंत्रणात ठेवते
.
बदलत्या हंगामात होणाऱ्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी भाजलेले आले खावे. यामुळे सर्दी-खोकला होत नाही
.
भाजलेले आले सेवन केल्याने गॅस आणि आंबट ढेकराच्या समस्या कमी होतात आणि अन्न लवकर पचते
.
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही
.