अक्रोड खाण्याचे फायदे जाणून घ्या

Lifestyle

24 june 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

अक्रोड खाण्याचे फायदे

ओमेगा-३ फॅटी ॲसिडस् आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेला हा सुकामेवा शरीरातील सूज कमी करण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. अक्रोड खाण्याचे फायदे जाणून घ्या

Picture Credit: Pinterest

अक्रोडमध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि विटॅमिन ई स्मरणशक्ती वाढवण्यास आणि मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करतात.

मेंदूसाठी उत्तम

Picture Credit: Pinterest

यातील हेल्दी फॅट्स रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवून हृदयविकाराचा धोका टाळतात.

हृदयाचे आरोग्य

Picture Credit: Pinterest

पचनशक्ती सुधारते

अक्रोडमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते, जे पचनक्रिया निरोगी ठेवते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.

Picture Credit: Pinterest

अक्रोड खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे भूक नियंत्रित राहून वजन कमी करण्यास मदत होते.

वजन नियंत्रित राहते

Picture Credit: Pinterest

त्वचेसाठी फायदेशीर

Picture Credit: Pinterest

यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स त्वचेला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवतात, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार राहते.

हाडे मजबूत होतात

Picture Credit: Pinterest

अक्रोडमध्ये 'अल्फा-लिनोलेनिक ॲसिड' असते, जे कमकुवत हाडे मजबूत करण्यास मदत करते.

खाण्याची योग्य पद्धत

Picture Credit: Pinterest

सुक्या अक्रोडपेक्षा रात्रभर पाण्यात भिजवलेले अक्रोड खाणे जास्त फायदेशीर मानले जाते. असे केल्याने ते पचायला हलके होतात आणि त्यातील पोषक घटक शरीरात लवकर शोषले जातात. तज्ज्ञांच्या मते, एका दिवसात २ ते ४ अक्रोड खाणे पुरेसे असते.