उन्हाळ्यामध्ये जांभूळ खाणे खूप फायदेशीर मानले जाते त्यामुळे अनेक आजार दूर होतात. जांभळ खाण्याचे फायदे जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
जांभूळ हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी सर्वोत्तम फळ मानले जाते. यातील बियांमध्ये 'जांबोलिन' आणि 'जांबोसिन' नावाचे घटक असतात, जे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवतात आणि रक्तातील साखरेचे उर्जेमध्ये रूपांतर करण्यास मदत करतात.
Picture Credit: Pinterest
उन्हाळ्यात पोटाचे विकार जसे की गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी जांभूळ फायदेशीर आहे. जांभळाचा रस यकृताचे कार्य सुधारण्यासाठीही उपयुक्त ठरतो.
Picture Credit: Pinterest
उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होते. जांभूळ खाल्ल्याने शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते. याशिवाय, जांभळामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे अशक्तपणा दूर होतो.
Picture Credit: Pinterest
जांभळामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. तसेच, उन्हाळ्यात त्वचेवर होणारा परिणाम कमी करून त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि नैसर्गिक चमक आणण्यासाठी जांभूळ मदत करते.
Picture Credit: Pinterest
जांभळामध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी हे एक उत्तम फळ आहे.
Picture Credit: Pinterest
जांभळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते, जे हाडे मजबूत करण्यासाठी आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करून हृदय निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असते.
Picture Credit: Pinterest
जांभूळ खाल्ल्यानंतर लगेचच दूध पिणे टाळावे. तसेच, रिकाम्या पोटी जांभूळ खाणे टाळावे.
Picture Credit: Pinterest