जटामांसी ही एक अत्यंत गुणकारी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. तणाव, निद्रानाश आणि केसांच्या समस्या दूर करण्यासाठी ही वनस्पती खूप फायदेशीर मानली जाते. जटामांसीचे फायदे जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
जटामांसी मज्जासंस्थेला शांत करते. यामुळे मानसिक ताण, भीती आणि चिंता दूर होण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
ज्यांना रात्री झोप न लागण्याची समस्या आहे, त्यांच्यासाठी जटामांसी उत्तम औषध आहे. ही कोणतीही सवय न जडवता गाढ झोप आणण्यास मदत करते.
Picture Credit: Pinterest
ही वनस्पती बुद्धी आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी ओळखली जाते. एकाग्रता वाढवण्यासही ती मदत करते.
Picture Credit: Pinterest
जटामांसीच्या मुळांचा वापर केस गळती थांबवण्यासाठी, केस मजबूत करण्यासाठी आणि अकाली पांढरे होणारे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी केला जातो.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
भूक न लागणे, अपचन आणि गॅसेसच्या समस्येमध्ये जटामांसीचे चूर्ण फायदेशीर ठरते.
Picture Credit: Pinterest
सर्वसामान्यपणे जटामांसी चूर्ण १ ते २ ग्रॅम प्रमाणात मधासोबत किंवा कोमट पाण्यासोबत घ्यावे