Written By: Trupti Gaikwad
Source: Yandex
योग्य आहार आणि व्यायाम या प्रमाणे आरोग्याला पुरेशी झोप मिळणं देखील महत्त्वाचं आहे.
मात्र असं असलं तरी तुम्ही कसं झोपताय यावर देखील तुमचं आरोग्य अवलंबून असतं.
डाव्या कुशीवर झोपल्याने महिलांच्या गर्भाशयाचं आरोग्य सुधारतं.
तुम्हाला अपचनासंबंधित तक्रारी डाव्या कुशीवर झोपल्याने काही प्रमाणात कमी होतात.
डाव्या कुशीवर झोपल्याने मणक्याशी संबंधित समस्या कमी होतात.
रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी आणि निरोगी हृदयासाठी डाव्या कुशीवर झोपणं फायदेशीर ठरतं.
डाव्या कुशीवर झोपल्याने मेंदूवरील अतिरिक्त ताण कमी होतो.