ॲनालॉग पनीरची खरी ओळख आणि आरोग्यावरील दुष्परिणाम

Lifestyle

07 August 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

ॲनालॉग पनीर म्हणजे काय

ॲनालॉग पनीर हा दुग्धजन्य पदार्थांमधील एक कृत्रिम पर्याय आहे. ज्यामध्ये वनस्पती तेल आणि इतर घटक वापरून तयार केला जातो. ते दिसायला सामान्य पनीरसारखे असले तरी ते दुग्धजन्य पदार्थ नाही

Picture Credit: Pinterest

ॲनालॉग पनीर' किंवा दुग्धेतर पनीर हे दुधाऐवजी वनस्पती तेल (पाम तेल), स्टार्च आणि रासायनिक पदार्थांपासून बनवले जाते. हे खाल्ल्याने पचनक्रिया बिघडणे, चरबी व कोलेस्ट्रॉल वाढून हृदयविकाराचा धोका निर्माण होणे तसेच यकृत व मूत्रपिंडावर ताण येण्यासारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

ॲनालॉग पनीरचे दुष्परिणाम

Picture Credit: Pinterest

यात ट्रान्स फॅट्स आणि संपृक्त चरबी असते, ज्यामुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल वाढून रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याचा धोका वाढतो.

हृदयाचे आजार

Picture Credit: Pinterest

कृत्रिम स्टार्च आणि रसायने पचायला जड असतात, ज्यामुळे पोट फुगणे, अपचन, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता असा त्रास होतो.

पचनसंस्थेचे विकार

Picture Credit: Pinterest

निकृष्ट पाम ऑइल आणि अतिरिक्त कार्बोहायड्रेट्समुळे शरीरातील कॅलरीज अनियंत्रित वाढून लठ्ठपणा आणि मधुमेह बळावतो.

वजन आणि लठ्ठपणा

Picture Credit: Pinterest

लिव्हर आणि किडनीवर ताण 

Picture Credit: Pinterest

शरीरासाठी अनिष्ट असलेली ही रसायने फिल्टर करताना यकृत आणि मूत्रपिंडावर अतिरिक्त ताण येतो.

असुरक्षित रसायने

Picture Credit: Pinterest

काही निकृष्ट दर्जाच्या नमुन्यांमध्ये पांढरेपणा आणण्यासाठी डिटर्जंट किंवा युरियाचा वापर केला जात असल्याचे उघडकीस आले आहे, जे कर्करोगासारखे आजार ओढवून घेऊ शकते.