Published Dev 06, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
थंडीत पालक, मोहरी, मेथी या हिरव्या भाज्या आवर्जून खाल्ल्या जातात. त्यापैकी मेथी ही शरीरासाठी अत्यंत फायदेशीर भाजी आहे
मेथीच्या भाजीचे अधिक सेवन केले जाते. पण मेथीच्या भाजीतून किती लोह आपल्या शरीराला मिळते माहीत आहे का?
श्री बालाजी अॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटमधील मुख्य डाएटिशियन प्रिया पालीवाल यांनी सांगितले की, 100 ग्रॅम मेथीमध्ये 186% लोह आढळते
शरीलाला लोहाची अत्यंत आवश्यकता असते कारण हे पेशी तयार करते, तसंच ऑक्सिजन पातळी आणि प्रतिकारशक्ती वाढवते
मेथीतील पोटॅशियम, लोह आणि नायट्रोजन हे आरोग्याच्या काळजीसह केसांच्या मजबूतीसाठीही उत्तम ठरते
मेथीतील फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स पचनासंबंधित त्रास कमी करण्यास मदत करतात आणि आरोग्य चांगले राखतात
.
मेथीच्या भाजीत अधिक फायबर असल्याने वजन नियंत्रणासाठी ही भाजी उत्तम उपाय ठरतो
.
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही
.