पालक डोसा बनवण्याची सोपी पद्धत

Life style

20 September, 2025

Author:  नुपूर भगत

 पालकाची पाने नीट धुऊन घ्या आणि हलक्या पाण्यात 2 मिनिटे उकळून थंड होऊ द्या.

पालक उकळून घ्या

Picture Credit: Pinterest

 मिक्सरमध्ये पालक, हिरव्या मिरच्या, आलं, जीरे आणि थोडं पाणी घालून मऊसर पेस्ट करून घ्या.

पालकाची पेस्ट

Picture Credit: Pinterest

 ही पालकाची पेस्ट डोश्याच्या पिठामध्ये टाका. चवीनुसार मीठ घाला आणि चांगले हलवून घ्या.

पीठामध्ये मिसळा

Picture Credit: Pinterest

 पीठ फार घट्ट असेल तर थोडं पाणी घालून पातळसर करा.

घट्टपणा तपासा

Picture Credit: Pinterest

 डोसा तवा मध्यम आचेवर गरम करून त्यावर थोडं तेल लावा.

तवा गरम करा

Picture Credit: Pinterest

एक मोठा चमचा पीठ तव्यावर टाकून गोलसर पसरवा आणि वरून थोडं तेल सोडा.

डोसा पसरवा

Picture Credit: Pinterest

 डोसा दोन्ही बाजूंनी खमंग भाजून गरमागरम चटणी किंवा सांबारसोबत सर्व्ह करा.

खमंग डोसा तयार

Picture Credit: Pinterest