www.navarashtra.com

Published Oct 23, 2024

By Narayan Parab 

 'अशी' झाली शिवसेनेची स्थापना

Pic Credit -  Social Media,

'गाव तिते शाखा आणि घर तिथे शिवसैनिक' या धोरणाने महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात पोहचलेला पक्ष म्हणजे शिवसेना.

शिवसेना

मार्मिकमधून बाळासाहेब ठाकरे हे मराठी माणसाच्या हक्कांबद्दल पोटतिडकीने लिहित होते आणि मराठी माणसाला जाग करण्याचा प्रयत्न करत होते.

मार्मिक

मराठी माणसे मार्मिकच्या कार्यालयात येत आणि आपली व्यथा मांडत. मार्मिकचे कार्यालय एक हक्काचे व्यासपीठ झाले होते.

 हक्काचे व्यासपीठ

मार्मिकमध्ये येणाऱ्या गर्दीचा ओघ पाहून प्रबोधनकार ठाकरे यांनी बाळासाहेबांना सांगितले की, या गोष्टीला संघटनेचा आकार द्या

संघटनेचा आकार द्या

बाळासाहेबांनी प्रबोधनकारांना विचारले की, संघटनेला नाव काय ठेवायचे त्यावर प्रबोधनकार उत्तरले "त्यात विचार कसला करता? शिवसेना."

नाव- शिवसेना

१९ जून १९६६ साली मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी लढणारी शिवसेना स्थापन झाली. ही स्थापना अवघ्या १८ जणांच्या उपस्थितीत झाली

शिवसेनेची स्थापना

२६ जून १९६६ च्या मार्मिकमध्ये शिवसेनेचे बोधचिन्ह म्हणून डरकाळ्या फोडणार वाघ छापण्यात आला. त्यासोबत शिवराय होतेच.

बोधचिन्ह

शिवराय हे शिवसेनेचे आराध्य दैवत, महाराज भवानी मातेचे प्रखर भक्त आणि वाघ हे भवानीच वाहन म्हणूनच वाघ शिवसेनेचे बोध चिन्ह

बोधचिन्हामागचा विचार

३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवाजी पार्कवर पहिला दसरा मेळावा झाला त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मेळाव्याला महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.

पहिला दसरा मेळावा

या पहिल्या दसऱ्या मेळाव्यातच जनतेला संबोधित करताना प्रबोधनकार ठाकरे म्हणाले "हा बाळ मी तुम्हाला या महाराष्ट्राला आज अर्पण करत आहे"! 

प्रबोधनकारांचे शब्द

महाराष्ट्राचा पुढचा CM कोण असणार? 'या' पाच नावांची चर्चा