Atherमध्ये Heroचा हिस्सा 32.8%! ₹1,758 कोटींच्या डीलने काय बदलणार?

Automobile

28 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Hero MotoCorp आता Ather Energyमध्ये आणखी ₹1,758 कोटी गुंतवणार आहे. या डीलमुळे Atherमधील Heroची हिस्सेदारी वाढणार आहे.

मोठी बातमी!

Picture Credit:pinterest

या गुंतवणुकीनंतर Atherमध्ये Hero MotoCorpची हिस्सेदारी 29.88% वरून जवळपास 32.8% होईल.

किती वाढणार हिस्सा?

Picture Credit:pinterest

ही रक्कम Atherकडून नवीन शेअर्स घेण्यासाठी नाही. Hero विद्यमान शेअरहोल्डरकडून ₹1,758 कोटींपर्यंतचे शेअर्स खरेदी करणार आहे.

पैसे कुठे जाणार?

Picture Credit:pinterest

या व्यवहारासाठी Hero MotoCorp रोख रक्कम वापरणार आहे. डील 3 सप्टेंबर 2026पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे

पूर्ण व्यवहार कॅशमध्ये

Picture Credit:pinterest

विशेष म्हणजे Heroने काही दिवसांपूर्वीच Atherमध्ये ₹1,000 कोटींची स्वतंत्र गुंतवणूक जाहीर केली होती.

आधीही केली मोठी गुंतवणूक

Picture Credit:pinterest

दोन्ही व्यवहार एकत्र पाहिल्यास Hero MotoCorpने Atherमध्ये सुमारे ₹2,758 कोटींची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे.

एकूण किती रक्कम?

Picture Credit:pinterest

Atherचा टर्नओव्हर FY2024 मधील ₹1,753.8 कोटींवरून FY2026 मध्ये ₹3,671.76 कोटी झाला आहे.

Atherचा व्यवसाय किती वाढला?

Picture Credit:pinterest

Ather इलेक्ट्रिक स्कूटरसोबत स्वतःचे चार्जिंग नेटवर्कही चालवते. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये 450 सीरिज आणि Rizta यांचा समावेश आहे.

Atherचा EV फोकस

Picture Credit:pinterest

Heroची वाढती गुंतवणूक Atherच्या EV विस्तारातील विश्वास दाखवते. Ather लवकरच Riztaपेक्षा खालील सेगमेंटसाठी EL प्लॅटफॉर्मवर आधारित नवीन मॉडेल आणणार आहे.

पुढे काय?

Picture Credit:pinterest