Published March 03, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
बेसन, पाणी, जीरं, हिरवी मिरची, टोमॅटो, लिंबाचा रस, किंवा चिंचेची पेस्ट
कसूरी मेथी, तेल, मीठ, हिंग, हळद, तिखट, गरम मसाला
एका पातेल्यात बेसन आणि पाणी एकत्र करून पातळ मिश्रण करा
दुसरीकडे, एका पातेल्यात तेल गरम करा, हिंग, जीरं, हिरवी मिरची टाकून परतवा
आता त्यात चिरलेला टोमॅटो घालून थोडी शिजवून घ्या, मग हळद, तिखट, आणि गरम मसाला घालून शिजवा
त्यानंतर या मिश्रणात बेसनाचं पातळ मिश्रण घाला, आणि ढवळत राहा
आता त्यात लिंबाचा रस किंवा चिंचेची पेस्ट घाला आणि 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर शिजवा
शेवटी कसूरी मेथी घाला, गरमागरम कढी भातासोबत किंवा पोळीसोबत खा