पाठीत चमक भरल्यास त्वरित आराम मिळवण्यासाठी पाठीला पूर्ण विश्रांती द्या, गरम पाण्याचा किंवा बर्फाचा शेक करा आणि तिळाच्या किंवा महानारायण तेलाने हलक्या हाताने मसाज करा. तसेच जास्त हालचाल टाळा आणि गरज असल्यास वेदनाशामक डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या.
Picture Credit: Pinterest
नजीकच्या जागेवर किंवा सपाट जमिनीवर सरळ झोपा. पाठीवर कोणताही ताण देऊ नका.
Picture Credit: Pinterest
दुखऱ्या भागावर गरम पाण्याच्या पिशवीने किंवा बर्फाने १० ते १५ मिनिटे शेक द्या.
Picture Credit: Pinterest
महानारायण तेल किंवा तिळाचे तेल हलके कोमट करून पाठीवर लावा. जोर किंवा दाब न देता अतिशय हलक्या हाताने मसाज करा.
Picture Credit: Pinterest
चमक भरली असताना कोणताही झटका येईल असा व्यायाम किंवा वाकण्याचे प्रकार करू नका.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
जायफळ पाण्यात किंवा तिळाच्या तेलात उगाळून कोमट करून पाठीला लावल्यास वात व वेदना कमी होतात.
Picture Credit: Pinterest
आल्याच्या रसात थोडे मध मिसळून घेतल्यास स्नायूंचा ताण व सूज कमी होण्यास मदत होते