सर्दीपासून लवकर आराम मिळविण्यासाठी करा हे उपाय

Lifestyle

08 August 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

सर्दीवर उपाय

सर्दीवर आराम मिळवण्यासाठी गरम पाण्याची वाफ घेणे, हळद घातलेले दूध पिणे आणि आल्याचा चहा किंवा काढा पिणे हे अत्यंत प्रभावी घरगुती उपाय आहेत.

Picture Credit: Pinterest

एका भांड्यात गरम पाणी घेऊन डोक्यावर रुमाल धरून वाफ घ्या; हवे असल्यास पाण्यात युकेलिप्टस (निलगिरी) तेलाचे किंवा ओव्याचे काही थेंब टाका, ज्यामुळे बंद नाक लवकर मोकळे होते.

वाफ घेणे 

Picture Credit: Pinterest

एक ग्लास गरम दुधात अर्धा चमचा हळद मिसळून रात्री झोपताना प्या, ज्यामुळे घशाची खवखव कमी होते व कफ सुटतो.

हळदीचे दूध 

Picture Credit: Pinterest

पाण्यात आले, तुळशीची पाने, मिरी आणि थोडे गुळ उकळून हा काढा दिवसातून दोनदा प्या, यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

आले आणि तुळशीचा काढा 

Picture Credit: Pinterest

कोमट पाण्यात थोडेसे मीठ टाकून दिवसातून दोन ते तीन वेळा गुळण्या करा, यामुळे घशातील जळजळ कमी होते.

मिठाच्या पाण्याच्या गुळण्या

Picture Credit: Pinterest

भरपूर पाणी

Picture Credit: Pinterest

दिवसभर कोमट पाणी किंवा सूप प्या, शरीरात पाणी कमी होऊ देऊ नका.

विश्रांती

Picture Credit: Pinterest

शरीराला आणि तापाने किंवा थंडीने त्रस्त असलेल्या मनाला पुरेशी विश्रांती द्या