आतड्यांतील जंत सहसा घाण, दूषित अन्न किंवा पाणी आणि स्वच्छतेच्या अभावामुळे होतात आणि म्हणूनच ही समस्या मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळते.
Picture Credit: Pinterest
पोटात जंत असल्यास पचनक्रियेत अडथळा येतो. यामुळे पोटदुखी आणि भूक न लागणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात, ज्याकडे दुर्लक्ष करू नये.
Picture Credit: Pinterest
पपई, सफरचंद खा आणि शक्यतो कोशिंबीर खावी. आपल्या आहारात फायबरचे प्रमाण वाढवावे. कारण हे पचनासाठी चांगले असते. पोटात जंत झाल्यास पचनाच्या समस्या उद्भवतात.
Picture Credit: Pinterest
आपल्या आहारामध्ये प्रोबायोटिक गोष्टींचा समावेश करावा. जसे की, दही, ताक. याव्यतिरिक्त घरी बनवलेले हलके आंबवलेले पदार्थ खायला हरकत नाही आणि खिचडीसुद्धा चालते.
Picture Credit: Pinterest
गोड पदार्थ किंवा जास्त साखर असलेले पदार्थ खाणे टाळा. मांसाहार किंवा बाहेरचे जंक फूडपासून दूर राहणे चांगले
Picture Credit: Pinterest
पोटात जंत होऊ नये म्हणून हात स्वच्छ धुवा. तुमची नखे लहान ठेवा
Picture Credit: Pinterest
पोटात जंत झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. मात्र या पद्धतीने आराम मिळू शकतो. जसे की, लसूण आणि भोपळ्याच्या बिया, अजवाइनचे पाणी, पीच खाणे
Picture Credit: Pinterest