जीभ भाजली! जळजळ होतेय? यावर घरगुती उपाय काय?

Lifestyle

14 JULY, 2025

Author: मयूर नवले

जीभ ही आपल्या ज्ञानेंद्रियांपैकी एक अवयव आहे. 

जीभ

Picture Credit: Pinterest

मात्र, काही पदार्थांमुळे आपली जीभ भाजली जाते.

जीभ भाजणे 

यावर घरगुती उपाय कोणते? चला याबद्दल जाणून घेऊयात. 

घरगुती उपाय

जीभ भाजल्यावर लगेच थंड पाणी प्यायल्याने जळजळ कमी होते आणि तात्पुरता आराम मिळतो.

थंड पाणी प्यावे

बर्फाचा तुकडा थोडा वेळ तोंडांत ठेवल्यास सूज आणि जळजळ दोन्ही कमी होतात.

आईस क्यूब 

थंड दही किंवा दुधाच्या सेवनाने तोंडातील उष्णता कमी होते आणि भाजलेल्या भागाला थंडावा मिळतो.

थंड दही किंवा दूध 

मध थेट भाजलेल्या जागी लावल्यास त्याच्या सूजविरहित व अँटीबॅक्टेरियल गुणांमुळे आराम मिळतो.

मध लावावा

दोन दिवसांनीही आराम न मिळाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

टीप