भारतामध्ये बरेच ठिकाणी उष्णतेचे तापमान 45 अंश सेल्सिअस आहे. या उष्णतेमुळे फक्त डिहायड्रेशन होत नाही तर घामुळ्यांसारखे त्वचेच्या समस्या उद्भवतात. यापासून आराम मिळविण्यासाठी जाणून घ्या उपाय
Picture Credit: Pinterest
घामोळ्या, ज्यांना मिलियारिया किंवा प्रिकली हीट असेही म्हणतात, ही उन्हाळ्यात आढळणारी एक सामान्य समस्या आहे. उष्णतेमध्ये, शरीर थंड ठेवण्यासाठी घाम येतो. जर हा घाम योग्य प्रकारे बाहेर पडला नाही, तर त्यामुळे त्वचेवर लहान, लाल पुरळ उठू शकते.
Picture Credit: Pinterest
धूळ, तेल आणि मृत त्वचेमुळे घामाच्या नलिका बंद होऊ शकतात, ज्यामुळे आतून जळजळ होऊ शकते. मात्र, उष्ण हवामानात घामोळ्यांमुळे अधिक त्रास होतो.
Picture Credit: Pinterest
अॅण्टीबैक्टेरिया गुणधर्म असलेली कोरफड त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते. हे लावल्याने कोणतेही नुकसान होत नाही. पाठीवर आणि मानेवर येणाऱ्या घामोळ्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कोरफड थेट लावता येते.
Picture Credit: Pinterest
चंदनामध्ये थंडावा देणारे आणि दाहशामक गुणधर्म असल्याने, घामोळ्या आणि मुरुमांवरही त्याचा उपयोग होऊ शकतो. चंदनाच्या पेस्टमध्ये गुलाबजल मिसळा आणि ते बाधित भागावर लावा आणि नंतर साध्या पाण्याने अंघोळ करा.
Picture Credit: Pinterest
मुलतानी माती देखील घामोळ्या आणि मुरुमांवर एक प्रभावी घरगुती उपाय आहे. तुम्हाला फक्त मुलतानी मातीमध्ये गुलाबाचे पाणी मिसळून ते लावायचे आहे.
Picture Credit: Pinterest
घामुळ्याच्या समस्या दूर करण्यासाठी कडुलिंबाची पाने उपयोगी येतात. अॅण्टीबैक्टेरिया गुणधर्म असलेली पाने पाण्यात उकळून घ्या. थंड झाल्यावर या पाण्याने आंघोळ करा आणि या लेप त्वचेला लावा.
Picture Credit: Pinterest
घामोळ्या असोत किंवा त्वचेवर खाज सुटून जळजळ होत असो, यावर नारळाचे तेल आणि कापूर हा आयुर्वेदिक उपाय आहे. या दोन्ही देशी घटकांमध्ये नैसर्गिकरित्या जळजळ किंवा खाज कमी करणारे गुणधर्म आहेत.
Picture Credit: Pinterest