Honda ADV160ची डिलिव्हरी पुढे ढकलण्यात आली आहे. ऑक्टोबरऐवजी आता ग्राहकांना 2027 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Picture Credit:Honda
Hondaने 25 ऑगस्ट 2026 रोजी ADV160 भारतात लॉन्च केली होती. त्यावेळी मध्य ऑक्टोबरपासून डिलिव्हरी सुरू होणार असल्याचं सांगितलं होतं.
Picture Credit:Honda
Hondaच्या वेबसाइटवरील नव्या माहितीनुसार, New Year 2027 नंतर डिलिव्हरी सुरू होईल. मात्र, कंपनीने अचूक तारीख जाहीर केलेली नाही.
Picture Credit:Honda
Hondaने डिलिव्हरी पुढे ढकलण्यामागचं अधिकृत कारण अद्याप सांगितलेलं नाही. त्यामुळे विलंबाचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही.
Picture Credit:Honda
Honda ADV160ची सुरुवातीची किंमत ₹1.70 लाख (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. बुकिंगसाठी ₹5,000 टोकन रक्कम घेण्यात आली होती.
Picture Credit:Honda
ADV160ची मोठी खासियत म्हणजे E85 Flex-Fuel compatibility. यामध्ये 85% पर्यंत इथेनॉल मिश्रण असलेल्या इंधनाचा वापर करण्याची क्षमता आहे.
Picture Credit:Honda
TFT कन्सोल, Honda RoadSync, Turn-by-Turn Navigation आणि HSTC मिळतं. सुरक्षेसाठी ड्युअल डिस्क ब्रेक आणि सिंगल-चॅनेल ABS आहे.
Picture Credit:Honda
ऑक्टोबरमध्ये स्कूटर मिळण्याची अपेक्षा असलेल्या ग्राहकांना आता 2027 पर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. Hondaकडून लवकरच डिलिव्हरीची अधिक स्पष्ट तारीख मिळण्याची अपेक्षा आहे.
Picture Credit:Honda